Tuesday, 15 July 2025

 

     

     म्हातारपण लवकर नको

 



तारुण्य टिकवण्यासाठी 'हे' 5 आयुर्वेदिक उपाय नक्की करा!

 तरुणांनाच काय, वयोवृद्धांनाही चिरतरुण राहायचं असत. पण त्यासाठी काही गोष्टी नियमित केल्या तर वाढतं वय थांबवता येतं!

 

खाली दिलेले 5 आयुर्वेदिक उपाय आयुष्यात अमृतासारखे ठरू शकतात:

 1️ शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळू द्या! 

-दीर्घ श्वसन करा, प्राणायाम करा 

-फुफ्फुसं मजबूत राहतील, पेशींना नवी ऊर्जा मिळेल 

-म्हातारपण दूर राहील

 

"प्रत्येक पेशीला ऑक्सिजन दिला, की शरीर झाडासारखं टवटवीत राहतं!"

 

2  दिवसात 3 वेळा अंघोळ करा अंगाला, आत्म्याला आणि मनाला 

-अंघोळीने केवळ शरीरच नाही, तर मनही प्रसन्न राहतं 

-ऊर्जेचा नवा झरा उघडतो 

-प्रदूषण, धूळ, वाईट स्पर्श सगळं धुवून निघतं

"अंघोळीमुळे फक्त शरीर नाही, मनही उजळतं!"

 

3 योग्य वेळी आहार घ्या आणि तेल-तूप वापरा 

-भरपेट खा पण वेळेवर 

-केसात, डोळ्यात, कानात तेल वापरा 

-तेल लावून सूर्यनमस्कार कराबघा कसं शरीर झळाळतं

 

"जेवणात वेळ, आहारात तूप आणि जीवनात शिस्त हीच तरुणपणाची गुरुकिल्ली आहे!"

 

4 दररोज 15 मिनिटं स्वतःशी जोडाध्यानधारणा करा

-“सृष्टी माझ्यासाठी आहेहा विचार

-मनात सकारात्मकता, चेहऱ्यावर तेज

"ज्याचं मन शांत, त्याचं शरीरही दीर्घकाळ शांत राहतं!"

 

5 झोप म्हणजे Recharge – ती घ्या प्रेमाने

-रात्रीची झोप = सकाळचा उत्साह

-झोपेमुळे शरीर भरून निघतं मानसिक आरोग्यही टिकतं

"जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा तुमचं शरीर काम करतं त्याला ती संधी द्या!"

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

No comments:

Post a Comment

  इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते , ५ दुष्परिणाम ; आरोग्य धोक्यात का घालता..... ? नूडल्स म्हणजे अनेकांच्या अतिशय आवडीचा आणि जिव...